जळगांव जिल्हासहकारसामाजिक

महिलांनी ऑनलाईन फसवणुकी पासुन सावध राहावे – मिनल करनवाल

ऑनलाइन फ्रॉड व फसवणूक होऊ नये यासाठी सतर्कता पंधरवाडा अभियान

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि. १० नोव्हेंबर : उमेद अंतर्गत महिला बचत गटांसाठी ऑनलाईन सतर्कता पंधरवाडा राबवण्याचा अभिनव उपक्रम जिल्हा  परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी हाती घेतला असून त्याची सुरुवात जामनेर तालुक्यातील उमेद अभियानातील कार्यरत महिला बचत गटांच्या समुदाय संसाधन व्यक्ती यांच्याशी ऑनलाइन संवाद साधून करण्यात आला .

उमेद अभियानाचे जिल्ह्यातील 2250 कार्यरत समुदाय संसाधन व्यक्ती अर्थात सीआरपी कार्यरत आहेत . जिल्ह्यात एकूण 67 प्रभाग संघ असून 1430 ग्राम संघातील एकूण 33000 स्वयंसहायता समूह सक्रिय आहेत . एका स्वयंसहाय्यता समूहामध्ये 10 महिला असे एकूण तीन लाख तीस हजार महिला जिल्ह्यात स्वयंसहायता समूहांमध्ये समाविष्ट आहेत. महिलांमध्ये ऑनलाइन फसवणुकीचे विविध प्रकार घडत असतात. त्यासंबंधी जाणीव जागृती होण्यासाठी जिल्हा परिषद जळगाव व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जळगाव यांच्या मार्गदर्शनाने महिलांमध्ये ऑनलाइन फ्रॉड व फसवणूक होऊ नये यासाठी सतर्कता पंधरवाडा राबविण्यात येत आहे .

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्ह्यातील कार्यरत महिला केडर सर्व समुदाय संसाधन व्यक्ती यांचे ऑनलाइन कार्यशाळा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव मीनल करणवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर तालुक्यातील सर्व केडर यांची कार्यशाळा घेण्यात आली . सदरील कार्यशाळेमध्ये महिलांनी ऑनलाइन फसवणुकीपासून सुरक्षित रहावे व सतर्क रहावे . तसेच कुठल्याही अनोळखी व्यक्ती यांनी पाठवलेले मेसेज ,लिंक याला प्रतिसाद देऊ नये , मोबाईल वापरताना काळजीपूर्वक वापरावा आपल्या मोबाईल मध्ये आलेले पासवर्ड कोणालाही शेअर करू नये तसेच आर्थिक व्यवहार करताना सांभाळून करावेत . कुठल्याही एसएमएस ऑनलाइन लिंक याबाबत तात्काळ प्रतिसाद देऊ नये त्याची शहानिशा करून समजदार व जाणकार व्यक्तीकडून त्याबाबत खात्री झाल्यावरच त्याबाबत प्रतिसाद द्यावा . कोणत्याही अमिषाला बळी न पडता आपले बँकिंग व्यवहार सांभाळून करावेत याबाबत मीनल करणवाल यांनी मार्गदर्शन केले. सदरील ऑनलाइन कार्यशाळेसाठी प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा राजू लोखंडे . लीड डिस्ट्रिक्ट बँक मॅनेजर सुनील कुमार दोहरे .जिल्हा अभियान व्यवस्थापक हरेश्वर भोई . व तालुका अभियान व्यवस्थापक सर्व टीम ऑनलाईन हजर होते .

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button