जळगावमहानगरसामाजिक

सार्वजनिक शिव जयंती महोत्सव अंतर्गत आज महिलांची बाईक रॅली

| लोकमाध्यम न्युज जळगांव | दि. १५ फेब्रुवारी २०२६ : जिजाऊ ब्रिगेड व मराठा सेवा संघ यांच्या द्वारा आयोजित सार्वजनिक शिव जयंती महोत्सव कार्यक्रम अंतर्गत शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांना नुकतेच आमंत्रित करण्यात येऊन कार्यक्रमा संबंधित काही नवीन संकल्पनांवर विचार विनिमय व चर्चा करण्यात आली.बैठकीत जळगांव जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष लीना पवार यांनी १५ फेब्रुवारी रविवार रोजी सायंकाळी 4 वाजता संभाजी राजे नाट्यगृह जळगांव येथून महिलांच्या बाईक रॅलीची सुरुवात होणार असून सांगता शिवतीर्थ मैदान येथे होईल असे सांगितले. 

रॅलीचा महत्वाचा विषय पर्यावरण आणि शिक्षण हा राहणार असल्याचेही जिल्हाध्यक्ष यांनी सांगितले. प्रसंगी शिव प्रतिज्ञा व संविधानाचे वाचन होणार आहे. राष्ट्वादीच्या जिल्हाअध्यक्ष (शरद पवार गट ) कल्पिता पाटील यांनी कामगार महिलांचा सन्मान करण्याचे सुचविले. तसेच यावेळी जिल्हा परिषद शाळांची स्थिती, महिलांकरिता शहरात उपलब्ध नसणारी स्वछता गृह, मुलींवर होणारे अत्याचार,ग्रामीण महिलांची निरक्षरता व सामाजिक जागरूकतेचा अभाव आदी समस्यावर विचार मंथन करण्यात येऊन पुढील कार्य काळात विशेष उपाययोजना करण्यासंबंधित चर्चा करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज जन सामान्यांच्या हृदयात बसलेले असून सार्वजनिक शिव जन्म महोत्सव हा सर्व समाजातील लोकांकरिता आहे.त्यामुळे सर्व समाजातील महिलांनी या रॅलीला मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिजाऊ ब्रिगेड कार्यकारणी द्वारा करण्यात आले.जळगांव जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष लीना पवार मार्गदर्शक ज्योती पाटील,राष्ट्वादीच्या जिल्हाअध्यक्ष (शरद पवार गट  कल्पिता पाटील नगरसेविका अंकिता पाटील सरीता पाटील, प्रा. नीता पाटील,सुचिता पाटील,पल्लवी भोगे, रश्मी कदम, जयश्री पाटील, वर्षा पाटील, ज्योती पाटील, शीतल पाटील, कल्पिता पाटील, वैशाली पाटील, सुश्मिता भालेराव, विद्या झनके, उज्वला सपकाळे, वंदना पाटील, स्मिता सिसोदे, मंगला कोतवाल,मीनाक्षी पाटील, दिपश्री अहिरराव आदी महिला उपस्थित होत्या.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button