डॉ. अनुज पाटील यांचे फिक्स आमदार साहेब असं लिहिलेली रांगोळी काढून अयोध्या नगरच्या महिलांनी केले स्वागत..
लोकमाध्यम न्युज | जळगांव १५ नोव्हेंबर २०२४ |
जळगांव – अयोध्या नगर मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) चे उमेदवार डॉ. अनुज पाटील यांच्या प्रचार रॅलीचे महिलांनी स्वागत करत ‘फिक्स आमदार साहेब’ अशी विशेष रांगोळी काढली. या अनोख्या स्वागताच्या माध्यमातून महिलांनी डॉ. अनुज पाटील यांच्याबद्दलचा आदर व्यक्त केला आणि त्यांच्या विजयाबाबत आश्वस्तता दर्शवली.
या वेळी महिलांनी मनसेच्या उमेदवाराला यंदा आमदार म्हणून निवडून देण्याची ग्वाही दिली. त्यांनी सांगितले की, डॉ. पाटील हे त्यांच्या समस्यांची सोडवणूक करतील आणि परिसराचा विकास साधतील, असा विश्वास त्यांना आहे. तसेच, डॉ. पाटील यांनीही महिलांना दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले आणि ते विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर स्थानिकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्याचे वचन दिले.
अशा प्रकारच्या अनोख्या स्वागतामुळे डॉ. पाटील यांच्या प्रचारात उत्साह निर्माण झाला आहे, आणि त्यांना स्थानिक जनतेकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.