जळगांव जिल्हाक्राईम

मध्यप्रदेशातून आंतरराज्य टोळीला अटक, ११ लाखांचा माल जप्त

एअरपोर्ट परिसरातील घरफोडीचा उलगडा

| लोकमाध्यम न्युज | जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील एअरपोर्ट परिसरातील तारा बिझनेस पार्कमध्ये झालेल्या मोठ्या घरफोडीचा एमआयडीसी पोलिसांनी छडा लावला आहे. मध्यप्रदेशातील सेंधवा येथील दुर्गम भागात वेशांतर करून शिरलेल्या जळगाव पोलीस पथकाने ६ जणांना बेड्या ठोकल्या असून ११ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

घटनेची पार्श्वभूमी

तारा बिझनेस पार्क भागातील रहिवासी मोईज अब्बाज बोहरा हे परिवारासह बाहेरगावी गेलेले असताना, १५ एप्रिलच्या सुमारास त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरी झाली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राहुल तायडे आणि पीएसआय चंद्रकांत धनके यांच्या पथकाने तांत्रिक तपास केला. आरोपी मध्यप्रदेशातील सेंधवा येथील अतिशय दुर्गम भागात असल्याचे समजताच पोलिसांनी तिथे वेशांतर करून पाळत ठेवली. निलेश उर्फ भुऱ्या डुडवे, ताराचंद सोलंखी, सायसिंग सोलंखी, रविंद्र आर्य, दिलीप डुडवे आणि ग्यारशीलाल अलावे (सर्व रा. सेंधवा, म.प्र.) यांना अटक करण्यात आली.

आरोपींकडून ३९ ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत ५.४७ लाख), चांदीचे दागिने (२५ हजार) आणि ५ लाख ७८ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ११ लाख ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button