जळगावसामाजिकसांस्कृतिक

जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद व कलादर्पणचा संयुक्त उपक्रम; डॉ. महिमा मिश्रा अय्यंगार व शिष्यांचा कलाविष्कार

| लोकमाध्यम News | जळगाव (प्रतिनिधी): अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, जळगाव जिल्हा शाखा आणि कलादर्पण यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता ‘अवतारम्’ या विशेष कथक नृत्य संध्येचे आयोजन करण्यात आले आहे. एम. जे. कॉलेज परिसरातील कालिदास सभागृहात हा शास्त्रीय नृत्याचा भव्य सोहळा रंगणार आहे. 

या कार्यक्रमात शहरातील प्रख्यात नृत्यांगना डॉ. महिमा मिश्रा अय्यंगार आणि त्यांच्या शिष्या कथक नृत्यातून विविध रूपांतील भगवान विष्णू यांच्या ९ अवतारांवर आधारित ‘अवतारम्’ ही संकल्पना रंगमंचावर साकारणार आहेत. भारतीय शास्त्रीय नृत्याची समृद्ध परंपरा, लय आणि भावमुद्रांचा अप्रतिम संगम या सादरीकरणातून रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.

या सोहळ्यास प्रवेश विनामूल्य असून, जळगावातील सर्व रसिक प्रेक्षक, कलावंत आणि नृत्यप्रेमींनी या देखण्या शास्त्रीय नृत्य सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखेचे उपाध्यक्ष ॲड. संजय राणे आणि कलादर्पणचे उपाध्यक्ष पद्मनाभन अय्यंगार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button