बसपाचा हत्ती पार करणार भाजप व काँग्रेसचे छोटे स्पिडब्रेकर
उमेदवार विजय काळे व विलास तायडे यांची पत्रकार परिषदेत माहिती
जळगाव दि.३० : रावेर व जळगाव लोकसभा मतदार संघात राष्ट्रीय बहुजन समाज पार्टीला मोठ्या प्रमाणात जनाधार मिळत आहे. त्यामुळे भाजप व काँग्रेससारखे छोटे स्पिडबेकर हत्ती लवकरच पार करणार आहे. निवडणूक आल्यानंतर केंद्रात बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष्ाा मायावती पंतप्रधान होतील आणि आम्ही 10 पर्यंत मोफत शिक्ष्ाणासह जातीविरहीत विकास करण्याचे ध्येय असल्याची माहिती रावेर मतदारसंघातील राष्ट्रीय बहुजन समाज पार्टी चे उमेदवार विजय काळे तसेच जळगाव लोकसभा चे उमेदवार विलास तायडे यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.सध्याची राजकारणाची स्थिती पाहता सगळीकडे बेडूक उड्या मारल्या जात आहेत. विकासापेक्षा एकमेकांवर चिखलफेकच जास्त होत आहे. यास जनता कंटाळली आहे. या दोन्हींना आता बसपाचा उत्तम पर्याय मिळाला आहे. जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघात मतदार जनता बसपाच्या पाठिशी आहे. त्यामुळे आम्ही भरघोस मतांनी विजयी होणार असल्याचा विश्वासही उमेदवार विजय काळे व विलास तायडे यांनी व्यक्त केला.
असा आहे अजेंडा
या निवडणूकीत विजयी झाल्यानंतर शिक्षण व आरोग्य क्षेत्राकडे लक्ष देणार आहे. सध्या प्रत्येक वस्तु गुजरातमधून येत आहे. हे आता चालणार नाही. महाराष्ट्रातूनही वस्तुंची बाहेर निर्यात होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. रावेर व जळगाव लोकसभा मतदार संघात जो विकासाचा अनुशेष बाकी आहे तो भरून काढणार आहे. त्यामुळे जनताच आमच्या कामाची दखल घेईल. जुनी पेन्शन योजना सुरू करणे, 10 वी पर्यत सर्वांना मोफत शिक्षण देणे, गावागावात आरोग्याच्या सुविधा देण्यावर भर राहणार असल्याचेही उमेदवार विजय काळे व विलास तायडे यांनी सांगितले.