कामगार दिना निमीत्त कामगारांना बागायती रुमाल वाटप
जळगाव जिल्हा ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती तर्फे आयोजन
जळगांव दि.२ मे २०२४ : १ मे जगभरात कामगारांना, मजुरांना समर्पित केला जातो. म्हणून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय श्रमिक दिवस’ म्हणजेच ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिवस’ म्हणून साजरा केला जातो. कामगारांचा सन्मान करण्यासोबतच कामगारांच्या हक्कांसाठी आवाज उठवता यावा, कामगारांचे समाजात स्थान अधिक मजबूत व्हावे, या उद्देशानेही हा दिवस साजरा केला जातो.
त्या साठी ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती जळगाव जिल्हा यांनी एक मे कामगार दिवस या दिवशी ग्राहक जनजागृती व हमाल मापडी संघटना यांना उन्हा पासून बचाव व्हावा या करीता बागायती रुमाल वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून रुख्मिणी फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष पंकज जैन हे उपस्थित होते. त्या प्रसंगी ग्राहक संरक्षण समिती चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. विजय साखला, जळगाव जिल्हा अध्यक्ष विजया पांडे, वरिष्ठ उपाध्यक्ष शुभांगी बिऱ्हाडे, सचिव नूतन तासखेडकर, जिल्हा संघटक मंगला दायमा, हजरत बिलाल कमिटी चे अध्यक्ष अकील पहेलवान, या सर्वांच्या हस्ते कामगारांना बागायती रुमालाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला सदस्य अनिल बिऱ्हाडे,विनोद अढाळके, लक्ष्मण पाटील, गणेश सोनार, गौरव भाऊ यांचे सहकार्य लाभले.