स्मिताताईंना अमळनेरमधून सर्वाधिक मताधिक्य देणार
ना.अनिल भाईदास पाटील यांचे आश्वासन
जळगाव दि ९ मे २०२४: जळगाव लोकसभेतील महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारार्थ अमळनेर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली. मेळाव्याला अमळेनरकरांनी प्रचंड गर्दी केली होती. अमळनेर विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांनी सर्वाधिक मताधिक्य मिळवून देवू, असे जाहीर आश्वासन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दिले.
जळगाव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचारार्थ अमळनेर येथे महायुतीच्या मेळाव्याला अमळनेरकरांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. या मेळाव्याला अमळनेरकरांमध्ये प्रचंड उत्साह होता. सभेचा परिसर “ अबकी बार मोदी सरकार” या घोषणांनी दणाणून गेला होता. यावेळी सर्व उपस्थित नागरिकांना देशाच्या विकासासाठी मतदानरुपी महायुतीला साथ देण्याचे आवाहन केले.
यावेळी माजी आमदार शिरिषदादा पाटील, जयश्रीताई पाटील, रिताताई बाविस्कर, उमेशभाऊ नेमाडे, भागवतभाऊ पाटील, हिरालाल पाटील, प्रथमेश पवार, यशवंत बैसाने, संदीप काटे, लालचंद सैनानी, सुभाष अण्णा चौधरी, मुख्तारभाई खाटीक, अशोकदादा पाटील, व्ही. आर. पाटील, शामबापू अहिरे, मीनाताई पाटील, राजश्रीताई बोलके, समाधान धनगर, विनोद जाधव, बाळासाहेब पाटील, सुषमा देसले यांसोबत महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.