लोकमाध्यम न्युज | जळगांव दि. ४ ऑगस्ट २०२४ |
लोकमान्य टिळक पुण्यतिथी,व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर चिपळूण आयोजित वक्तृत्व स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि कॉलेज खेर्डी चिंचघरी सती विदयालयातील विदयार्थ्यांनी यश संपादन केले.सदर स्पर्धेत तालुक्यातून 43 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेत प्राथमिक गटात कु.वेदांत महाडिक तृतीय क्रमांक माध्यमिक गटात कु.मृण्मयी प्रसाद जोग तृतीय क्रमांक व उच्च माध्यमिक गटात कु. अथर्वी अजित चव्हाण तृतीय क्रमाक प्राप्त केला.या सर्व विद्यार्थ्यांना .पल्लवी शिंदे, शर्मिला जाधव, अंजली दाभोळकर, पुष्कर कानिटकर यांनी मार्गदर्शन केले.
त्यांच्या या यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष,आमदार शेखर निकम ,संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड,संस्थेचे सेक्रेटरी .महेश महाडिक,संस्थेचे जेष्ठ संचालक .शांताराम खानविलकर,संस्थेचे सर्व पदाधिकारी,विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय वरेकर,उपमुख्याध्यापक विश्वास दाभोळकर, पर्यवेक्षक पांडुरंग पाटील ,पर्यवेक्षिका आसावरी राजेशिर्के,सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, यांच्यावतीने कौतुक करण्यात आले.