प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे जळगाव विमानतळावर स्वागत
लोकमाध्यम न्युज | जळगाव २५ ऑगस्ट २०२४ |
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे लखपती दिदी मेळाव्यासाठी आज जळगाव विमानतळावर आगमन झाले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वागत प्रसंगी राज्याचे मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील, मुख्य सचिव सुजाता सौनिक, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी आदी मान्यवर उपस्थित होते. विमानतळ स्वागतानंतर त्यांनी तेथे उपस्थित लखपती दिदींशी संवाद साधला. त्यानंतर त्यांचे लखपती दिदी संमेलन स्थळी आगमन झाले.
प्रधानमंत्र्यांच्या आगमनापूर्वी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाले. त्यांचे स्वागत नाशिक विभागीय आयुक्त प्रविण गेडाम यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. याप्रसंगी त्यांच्या समवेत असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही स्वागत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.