प्रभाग १६ तील देविदास कॉलनी ढाकेवाडी,संचार नगर येथील नागरिकांचे ठिय्या आंदोलन
मनपा अधिकाऱ्यांकडून ठेकेदारास दहा दिवसात कामे सुरू करण्याचे आदेश

जळगांव दि.२०: येथील पंचमुखी हनुमान मागील प्रभाग क्रमांक 16 येथील देविदास कॉलनी, ढाकेवाडी, संचार नगर तसेच नानीबाई कॉम्प्लेक्स ते जोशी कॉलनी बगीचा येथील मुख्य व कॉलनी अंतर्गत रस्त्यांच्या समस्यांवर संबंधित मनपाचे अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून वारंवार निवेदन व विचारना केल्या नंतर सुद्धा उडवा उडवी ची उत्तरे मिळत असल्यामुळे आज २० रोजी सकाळी ८ वाजेपासून प्रभागातील संतप्त नागरिक लाठी शाळा येथील मनपाच्या बांधकाम विभागा शासकीय इमारतीच्या प्रवेश द्वारावर ठिय्या आंदोलनासाठी बसले . त्यामुळे तीन तास बांधकाम विभागाचे कर्मचारी ऑफिसच्या बाहेर ताटकळत उभे होते. संतप्त नागरिकांच्या रोषाकडे पाहून संबंधित अधिकारी, नगरसेवक व ठेकेदार हे स्वतः आंदोलन करीत असलेल्या ठिकाणी नागरिकांची भेट घेण्याकरिता हजर झाले. यावेळी आंदोलनकर्ते नागरिकांनी त्यांच्या समोर समस्यांचा पाढाच वाचला. मनपाचे मुख्य अभियंता चंद्रकांत सोनगिरे ,योगेश बोरोले यांनी कॉन्ट्रॅक्टर स्वप्निल चौधरी यांना दहा दिवसाच्या आत मुख्य रस्त्याचां कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच कॉलनीतील रस्त्यांच्या कामाचे वर्क ऑर्डर आज रोजी सर्व सह्या घेऊन लवकरात लवकर त्या फाईल प्रदर्शित करून कामाची सुरुवात करू असे सर्व नागरिकांसमोर आश्वासन दिले. संबंधित ठिय्या आंदोलनाची दखल घेत जळगांव जागृत जनमंच चे शिवराम पाटील माजी नगरसेवक प्रशांत नाईक,कुंदन काळे यांनीही आंदोलन कर्त्या नागरिकांची बाजू घेत अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांचेकडून रस्त्यांची कामे सुरू करण्याचे वदवून घेतले. यावेळी उमेश सोनवणे, विकी सोनार, गणेश सपके, विवेक जगताप, पंकज शर्मा, संकेत जंगले, मुकुंदा वाणी, स्वप्नील जगताप, अँड.संजय निमगळे, अँड. नीतू निमगळे, किरण प्रजापत, मुकेश साळवे, विष्णू प्रजापत, सुभाष चौधरी यांच्यासह परिसरातील अन्य शंभर ते दीडशे नागरिक उपस्थित होते.