जळगावताज्या बातम्यासांस्कृतिक

स्व.भवरलाल जैन यांच्या गुणसंपदेचे भक्ती संगीत संध्येतून प्रेरणादायी स्मरण

श्रद्धावंदन दिनानिमित्त अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण

जळगाव दि.२५ – ‘कर्म हेचि जीवन’ मानणाऱ्या जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलाल जैन अर्थात मोठेभाऊ यांचा २५ फेब्रुवारी श्रद्धावंदन दिन निमित्त अनुभूती निवासी स्कूलच्या वतीने ‘भक्ती संगीत संध्येतून मोठ्याभाऊंच्या गुणसंपदेचे प्रेरणादायी स्मरण करण्यात आले. 

भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या सहकार्यातून संजीवनी फाऊंडेशन व परिवर्तनतर्फे आयोजित सहा दिवसीय मैत्र महोत्सवाचा आज दुसरा दिवस होता. भाऊंच्या उद्यानातील एम्फी थिएटर मध्ये सुरू असलेल्या या महोत्सवात आज अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी गितार, तबला, बासरी, किबोर्डसह इतर वाद्यांच्या साथ संगतीने गायनातून दादाजींच्या जगण्याचे सार्थकत्व अधोरेखित केले.

याप्रसंगी प्रमूख अतिथी म्हणून अनुभूती स्कूलचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशन सिस्टीम चे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, ज्योती जैन, स्कूलच्या संचालिका निशा जैन, डाॕ. भावना जैन, सुनिता भंडारी ,महोत्सव प्रमुख अनिल कांकरिया, स्वरूप लूंकड, पारस राका, नारायण बाविस्कर आदी उपस्थित होते. श्रध्देय भवरलाल जैन यांना श्रध्दांजली अर्पण करून स्वरानुभूतिची सुरवात झाली. सुत्रसंचालन अनुष्का महाजन, नमित जैन यांनी केले.

तबला सोलोची जुगलबंदी

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांसाठी दादाजींचं प्रेम मोठ्याभाऊंनी दिलं. त्याच आत्मियेतून अनुभूती निवासी स्कूल च्या विद्यार्थ्यांनी ‘भक्ती संगीत संध्या’ प्रस्तुत केले. तबला वादनामध्ये तीन ताल मध्ये उठान, कायदा, रेला, तुकडा, चक्रधर प्रस्तुत केले. तिन ताल मध्ये ठाठ, आमद, टुकडे आणि लडी सादर केले. यानंतर तीन ताल मध्ये लखनौ घराण्याच्या कथ्थक नृत्याने रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. ‘हे राम अच्यूत्तम केशवा..’ ने आनंदाची अनुभूती करून दिली. मोठेभाऊंचे पाणी, माती यासह सृष्टीसंवर्धनाचे कार्याचे स्मरण करत, विठु माऊली तु माऊली जगाची… राधा राणी लागे.. खेळ मांडला.. मोह लागे लगन.. वृक्षवल्ली आम्हां सोयरे.. मिठा क्रिष्णा नाम है.. अशी गीत गायली. औपचारिक शिक्षणासोबतच अनुभवाधारित व भारतीय संस्कृतीची संस्कारमूल्यं रूजविणाऱ्या अनुभूती निवासी स्कूलद्वारा संपन्न झालेल्या भक्ती संगीत संध्येला जळगावकरांनी भरभरून दाद दिली. तबला गुरू अमृतेश शांडिल्य, गायन गुरू आकाश बिस्वाल, कथ्थक गुरू सोनम शांडिल्य यांनी अनुभूतीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

 

 

 

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button