जळगांव जिल्हाविधानसभा निवडणूक

भाजपानेच दुसरा उमेदवार उभे करत मत फोडण्याचे काम केलं : बाळासाहेब थोरातांचे भाजपा वर टिकास्त्र

राज्यघटना, लोकशाही आणि धर्मवाद वाचवायचा असेल तर भाजपाला मतदान करु नका

लोकमाध्यम न्युज | जळगांव ८ नोव्हेंबर २०२४ |

रावेर (प्रतिनिधी) : राज्यघटना, लोकशाही आणि धर्मवाद वाचवायचा असेल तर भाजपने उभ्या केलेल्या दुसऱ्या कोणत्याही उमेदवाराला भाजपला मतदान करू नका एकी ठेवा असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी रावेर यावल मतदार संघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांच्या रावेर येथे आयोजित जाहीर सभेत व्यक्त केले.


रावेर यावल विधानसभा मतदारसंघ निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांच्या प्रचारार्थ (दि.७) रावेर येथे आठवडे बाजार मैदानावर माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलतांना ते पुढे म्हणाले की, हे विकासावर बोलणार नाही भाजपनेच या ठिकाणी दुसरा उमेदवार करत मत फोडण्याचे काम केले आहे भाजपवर टीकास्त्र करत बाळासाहेब यांनी रावेर येथील सभा गाजवली तसेच धनंजय चौधरी यांच्यासाठी मतदानाची साद देखील घातली. या जाहीर सभेला तेलंगणाच्या ग्रामविकास मंत्री सीताक्का, शिवसेना संपर्क नेते संजय सावंत, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, माजी जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, उदय पाटील, ज्येष्ठ नेते रवींद्र भैय्या पाटील, माजी आमदार रमेश दादा चौधरी, श्रीराम पाटील, आमदार शिरीषदादा चौधरी यांचेसह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी धनंजय चौधरी यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले एका परिपक्व व्यक्तीसारखं भाषण आज या तरुण युवकाने केले. तुमच्यासमोर तुमचा गडी तयार आहे, तुम्हाला गोड फळ खायचं असेल कायम चांगल्या गोष्टी हव्या असतील तर त्यासाठी त्याला मशागत करावीच लागते. नक्कीच मतदार मतदार संघातील नागरिक धनंजयला बळ देतील. तरुण जरी नवखा उमेदवार असला तरी त्याला तुमची साथ द्या. तो पुढचे अनेक वर्ष कायम तुमच्यासोबत असेल असे देखील यावेळी ते म्हणाले.
भाजपावर टीकास्त्र करताना त्यांनी सांगितले राज्यघटना ही प्रत्येकाला समान अधिकार देते पण राज्यघटना तोडण्याचे काम हे भाजप करत आहे आपल्या येथील महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यावर आपल्या सगळ्यांना अभिमान आहे त्यांना संसद भवनाच्या उद्घाटनाचा निमंत्रण देखील यांनी दिलं नाही. हे असे भाजप सरकार श्रीराम हे सगळ्यांचे त्यांच्या उद्घाटनाला देखील आमच्या महिला राष्ट्रपती यांना निमंत्रण दिले गेले नाही. यांचा राम देखील खरा राम नाही यांचा राम फक्त नथुराम आहे खरा राम आमचा आहे. आमच्या महात्मा गांधी यांनी सुद्धा त्यांच्या शेवटच्या क्षणी शेवटचा शब्द हे राम हाच उच्चारला होता. सध्याचे सरकार देखील हे महाराष्ट्राला मान्य नाहीये. महाविकास आघाडीने पूर्ण दोन वर्ष कोरोना मध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. प्रत्येक गोष्टीची आम्ही काळजी घेतली महाविकास आघाडीचे सरकार तोडण्याचे काम केलं.
महाराष्ट्र मोडीत काढल्याने त्यांनी ७० हजार कोटींचा घोटाळा केला यांचेच पंतप्रधान बोलले, लगेच इकडे येऊन परत तिजोरीच्या चाव्यात त्यांनाच दिल्या, असे म्हणत न खाऊंगा न खाऊ दुकाने दूंगा असे म्हणणाऱ्यांनी भ्रष्टाचाराचे दुकान उघडून ठेवलं असे म्हणत अजित पवारांवरही त्यांनी निशाणा साधला. इथे लाडक्या बहिणीच्या योजना देतात मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार करतात त्यावर यांचे लक्ष नाही. रोजचे महिलांवर अत्याचार होतात तुमची बहीण लाडकी नाहीये सत्तेसाठी चाललोय फक्त युवक शेतकरी यांच्यावर बोलायला कोणी तयार नाही याला अजिबात बळी पडू नका, असे म्हणत तुमचा एक प्रतिनिधी म्हणून धनंजयला पाठवायचं. तुम्हाला एक चांगला आमदार म्हणून तुम्ही धनंजयला पाठवायचं. आपण सर्व एक कुटुंब आहोत, तुमच्या कुटुंबातलाच एक सदस्य आमदार होतोय, असे म्हणून धनंजयला आपण सगळ्यांनी साथ द्यावी आणि मतदान करावं असे आवाहन यावेळी धनंजय चौधरी यांच्या प्रचारार्थ असलेल्या जाहीर सभेत बाळासाहेब थोरात यांनी केले.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button