शासनाने अल्पसंख्याक समाजाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक समस्यांवर लक्ष द्यावे
लोकमाध्यम न्युज | जळगांव १८ डिसेंबर २०२४
शासनाने मुस्लिम सेवाभावी संस्था आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय सहभाग घेणाऱ्या लोकांना अल्पसंख्याक समाजाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक समस्यांवर लक्ष देतांनाच चर्चा करण्यासाठी आमंत्रित करावे. अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.
सध्याच्या काळात विशेषतः पोलिस खाते, शिक्षण विभाग, महसूल विभाग, राष्ट्रीयीकृत बँका आणि इतर सरकारी कार्यालयांमध्ये मुस्लिम अल्पसंख्याक समाज संख्याच्या तुलनेत सर्वाधिक मागासलेला आहे. त्यामुळे मुस्लीम समाजाला समाजाच्या प्रगतीसाठी पुढे नेण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करण्याची गरज आहे. अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदन देतांना भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक युवा मोर्चा महानगराध्यक्ष अशफाक मुनाफ खाटीक, सरचिटणीस जावेद सलिम खाटीक, सरचिटणीस मोसीन शाह, चिटणीस शाहीद मजीद शेख, शाकीर शेख, जाकीर पठाण, इमरान कुरेशी, वसीम कुरेशी,गईन सैय्यद, सलीम गुलाम अली.आदी कार्यकर्ते उपस्थित होते.