लोकमाध्यम न्युज | जळगांव ६ जानेवारी २०२५ |
येथील पंचमुखी हनुमान मंदिरा मागील श्री दत्त मंदिर गणेशवाडी परिसर या ठिकाणी श्री राम जन्मभूमी तीर्थ अयोध्या येथील प्रभू श्रीराम लल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा प्रथम वर्धापन दिनानिमित्त सोमवार दिनांक ६ रोजी श्री गणपती पूजन व कळस पूजनाने श्रीमद् भागवत कथेस प्रारंभ झाला.
परिसरातील भाविकांच्या हस्ते कळस पूजन संपन्न झाले.
६ जानेवारी ते रविवार दिनांक १२ जानेवारी पर्यंत दुपारी २ ते ५ या वेळेत भव्य संगीतमय श्रीमद् भागवत कथा सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे.
कथेच्या प्रथम दिवशी श्रीमद् भागवत कथेचे महात्म्य भक्ती ज्ञान वैराग्याची कथा तसेच गोकर्ण चरित्राची कथा संपन्न झाली. हिंदुस्तान ही देवभूमी असून महाराष्ट्र ही संतभूमी आहे हिमालयांसारख्या पर्वतरांगा तसेच पवित्र नद्या हे आपल्या हिंदुस्थानाचं वैभव आहे. हजारो वर्षांपूर्वी ऋषीमुनींनी जगाच्या कल्याणासाठी ग्रंथांची रचना करून ठेवली आहे. हजारो वर्षांपूर्वीचे ऋषीमुनींचे जगाच्या कल्याणाचे विचार आज कलियुगात तंतोतंत खरे ठरत आहे. कलियुगात भगवंताचे नाम हे अतिशय पवित्र असून नामस्मरण केल्याच्या योगाने आत्मिक समाधान जीवनात नक्की प्राप्त होते असे ह भ प देवदत्त महाराज जळगावकर यांनी कथेचे निरूपण करीत असताना सांगितले.
कथेच्या प्रथम दिवशी संपूर्ण सभा मंडप भाविकांच्या उपस्थितीने भरला होता भव्य असे व्यासपीठ कथेसाठी तयार केले असून पहिल्याच दिवशी कथेला भाविकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे गणेशवाडी परिसर हा भक्तिमय झालेला आहे
जास्तीत जास्त भाविकांनी या कथा श्रावणाचा लाभ घ्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते संजय श्रीराम चौधरी उर्फ विठोबा तसेच माजी नगरसेविका मंगलाताई संजय चौधरी व परिसरातील समस्त भाविकांनी केले आहे.