
| लोकमाध्यम न्यूज | जळगांव २० जानेवारी २०२५ |
शहरातील मेहरूण येथील साईबाबा मंदिराचा १८ व्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे या वर्षीही मंदिर व्यवस्थापना तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात दिनांक २३ ते २५ जानेवारी रोजी दररोज संध्याकाळी रात्री ८ ते ११ यावेळेत महाराष्ट्र साई सेवा परिवाराचे अध्यक्ष साई कथाकार साई गोपालजी देशमुख यांच्या सुमधुर वाणीतून “दरबार मेरे साई का” या श्री साईबाबा यांच्या जिवन चरित्रावरील “साईकथेचे” आयोजन करण्यात आले आहे
तसेच २५ जानेवारी रोजी दुपारी ११ ते २ यावेळेत साईप्रसाद (भंडारा) आयोजित करण्यात आला आहे. साई भक्तांनी वरील सर्व कार्यक्रमासाठी आपली सहकुटुंब, सहपरिवार इष्टमित्रासह अनमोल उपस्थिती राहण्याचे आआवाहन करण्यात आले आहे.
ज्या साईभक्तांना साई भंडाऱ्या साठी स्वेच्छेने वस्तू रूपाने अथवा आर्थिक स्वरूपात मदत करण्याची ईच्छा असेल त्यांनी मंदिर व्यवस्थापन यांचेशी संपर्क साधून या अन्नदान यज्ञात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.