
| लोकमाध्यम न्यूज | जळगांव २१ मार्च २०२५ |
२० मार्च जागतिक चिमणी दिना निमित्त जळगाव येथील रुख्मिणी फांऊडेशन मिडटाऊन व भारतीय जैन संघटना यांचा संयुक्त विद्यमाने पक्षांसाठी परळ व धान्य पुड़ी चे वाटप करण्यात आले.
सद्याच्या कडक उन्हात पक्षांना पाण्याची अडचण लक्षात घेऊन जळगाव येथील नवीन बस स्टॅड वर परळ व धान्य पुड़ी चे वाटप कार्यक्रमाचेआयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी
प्रमुख अतिथी भा जैन संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय पारख, माजी नगरसेवक अमीत काळे, डॉ अमीत वर्मा ,प्रमोद साबद्रा यांचे हस्ते नागरिकांना 200 परळ वाटप करण्यात आले. या उपक्रमाकरिता डॉ अमीत वर्मा यांचे सहकार्य लाभले.
आपण गंच्ची, गॅलरी मध्ये पाण्याचे परळ व धान्यदाणे ठेवल्यास पक्षींना फारच मदत होते हया साठी सर्व नगारीकांनी जमेल तर एक परळ पक्षींन साठी या प्रमाणे गच्चीवर ठेवावे असे डॉ अमीत वर्मा यांनी सांगितले.
या वेळी विनय पारख हयांनी उपक्रमाचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या, पक्षीनां उन्हाळयात पाणी साठी फारच मदत होईल सांगीतले.आभार प्रदर्शन अध्यक्ष राजीव श्रॉफ यांनी केले
या प्रसंगी अध्यक्ष राजीव श्रॉफ, पंकज जैन, निलेश नागला, डॉ विजय साखंला, ज्योती श्रीवास्तव, महाश्वेता माथुरवैश्य, अभीषेक राखेचा, एस टी कर्मचारी व नागरीक उपस्थीत मोठया संख्येने उपस्होथित होते.