जळगाव दि. १५ : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव महानगराच्या वतीने मुजे महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या ऑफिस बाहेर ठीय्या आंदोलन करण्यात आले.प्रसंगी शेकडो विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले होते.इतर स्वायत्त महाविद्यालयां प्रमाणे मुजे महाविद्यालयाने देखील विद्यार्थांच्या पुनर्परीक्षा घ्याव्यात त्याचबरोबर वाढविलेले परीक्षा शुल्क कमी करावे या मागण्यां करीता अभावीपने ठिय्या आंदोलन हाती घेतले होते.
आंदोलनाचे गांभीर्य लक्षात येताच महाविद्यालयीन प्रशासनाने विषयात लक्ष घालण्यासाठी एक समिती नियुक्त केली व पुढील काही दिवसात समिती सकारात्मक निर्णय घेईल असे आश्वासन प्राचार्यांनी आपल्या दालनाच्या बाहेर येऊन विद्यार्थांना दिले.जर येत्या काळात या मागण्या महाविद्यालय प्रशासनाने पूर्ण केल्या नाही तर यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन विद्यार्थी परिषद करेल असा इशारा महानगर मंत्री मयूर माळी यांनी दिला.
प्रदेश सहमंत्री वरून नन्नवरे,महानगर सह मंत्री भाविन पाटील,महाविद्यालय अध्यक्ष यश देशमुख,नितेश चौधरी,शिवा ठाकूर,चिन्मय महाजन,शुभम पाटील,ओम थोरात,आविष्कार राजपूत,गौरव राजपूत,स्नेहा मोरे,चिन्मयी बाविस्कर,प्रतीक साळी,राहुल माळी, गोपाल मोरे,मनीष राजपूत,चांदणी चौधरी,भूमिका बडगुजर,रुपाली येवलेकर, हर्षदा पाटील,विवेक राजपूत,दीक्षा सोनवणे, क्षितिजा मोरानकर,आश्विन वाघ, मनस्वी पाटील, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात झाले होते.