जळगाव जिल्हा पोलीस दलातील ५ अधिकारी २३ अंमलदारांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर
उत्कृष्ट कामगिरीबद्दल महासंचालकांकडून गौरव

| लोकमाध्यम न्युज | जळगाव : (प्रतिनिधी) – महाराष्ट्र पोलीस दलातील उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिला जाणारा मानाचा ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह (DG Insignia) – २०२५’ पुरस्कार जाहीर झाला असून, जळगाव जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांनी या यादीत ठसा उमटवला आहे. जिल्ह्यातील एकूण ५ अधिकारी व २३ अंमलदारांना या सन्मानाने गौरविण्यात आले आहे. मुंबई येथे दि. २९ एप्रिल २०२६ रोजी या संदर्भातील आदेश निर्गमित करण्यात आले.
या सन्मानामध्ये जळगाव जिल्ह्यातील पुढील अधिकारी व अंमलदारांचा समावेश आहे :
अण्णासाहेब बाळासाहेब घोलप (पोलीस उप अधीक्षक, चोपडा उपविभाग), विठ्ठल शंकर फुसे (पोलीस उप निरीक्षक, श्वान पथक जळगाव), रविंद्र सर्जेराव गायकवाड (पोलीस उप निरीक्षक), भरतसिंग प्रल्हादसिंग पाटील (श्रेणी पोलीस उप निरीक्षक, जळगाव शहर पोलीस स्टेशन), दिलीप मेघराज जाधव (सहाय्यक पोलीस उप निरीक्षक), शामकांत दिनकर सोनवणे (सहाय्यक पोलीस उप निरीक्षक), मिनाक्षी दिलीप सावळे (सहाय्यक पोलीस उप निरीक्षक, जिल्हा विशेष शाखा जळगाव), सलीमखान वशारत खान (सहाय्यक पोलीस उप निरीक्षक, बँड पथक जळगाव), सखाराम छबुराव सकट (श्रेणी पोलीस उप निरीक्षक, बँड पथक जळगाव), अफजलखान युसूफ खान (सहाय्यक पोलीस उप निरीक्षक, बँड पथक जळगाव), अनिल भाऊराव चौधरी (कार्यकारी श्रेणी पोलीस उप निरीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय भुसावळ), मोहम्मद सलीम शेख मुसा (कार्यकारी सहाय्यक पोलीस उप निरीक्षक, AHTU जळगाव), नितीन प्रकाश वाविस्कर (पोलीस हवालदार), संदीप रमेश पाटील (पोलीस हवालदार, स्थानिक गुन्हे शाखा जळगाव), अकरम याकुब शेख (पोलीस हवालदार, स्थानिक गुन्हे शाखा जळगाव), अशोक दौलत अहिरे (पोलीस हवालदार, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय जळगाव), किरण निंबालाल धमके (पोलीस हवालदार, जिल्हा विशेष शाखा जळगाव), विद्या हरीलाल पाटील (पोलीस हवालदार, भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन), विजय बळीराम नेरकर (पोलीस हवालदार, अपर पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव), राहुल भिमराव सोनवणे (पोलीस हवालदार), संदीप भिकन पाटील (पोलीस हवालदार, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय भुसावळ), सूरज मधुकर पाटील (पोलीस हवालदार), विजय गोरखनाथ पाटील (पोलीस हवालदार), इरफान यासिन मलीक (पोलीस हवालदार), अश्विन साहेबराव हडपे (पोलीस हवालदार), अतुल संतोष चौधरी (पोलीस हवालदार, AHTU जळगाव), सचिन रमेश सोनवणे (पोलीस नाईक), संदीप अशोक नन्नवरे (पोलीस नाईक, रामानंदनगर पोलीस स्टेशन).
या गौरवामुळे जळगाव जिल्हा पोलीस दलाचा सन्मान वाढला असून, संबंधित अधिकारी व अंमलदारांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनीही सर्व सन्मानितांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.






