शास्त्री फार्मसी महाविद्यालयास सातत्याने तिसर्यांदा उत्कृष्ट मानांकनाचा दर्जा
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोठे योगदान ; अध्यक्ष व प्राचार्य डॉ.विजय शास्त्री,सचिव रूपा शास्त्री
लोकमाध्यम न्युज | जळगाव २६ ऑगस्ट २०२४ |
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या वतीने शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी पळासदळ, एरंडोल जि. जळगाव या महाविद्यालयास उत्कृष्ट श्रेणी प्रदान करण्यात आली आहे.
शैक्षणिक वर्ष 2018-19 मध्ये स्थापन झालेल्या या महाविद्यालयास फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली या केंद्रीय संस्थेची व तंत्र शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांची मान्यता आहे. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या शैक्षणिक देखरेख समितीच्या पथकाने जून 2024 मध्ये महाविद्यालयास भेट देऊन महाविद्यालयातील इन्फ्रास्ट्रक्चर तसेच होणारे लेक्चर, प्रॅक्टिकल, उपलब्ध असलेले साहित्य, मशिनरी, लायब्ररी सुविधा, लॅबच्या सुविधा, कॉम्प्युटर विभाग, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा आढावा घेतला तसेच विद्यार्थ्यांचे मॅन्युअल, ट्युटोरियल, असाइनमेंट बुक्स यांची तपासणी करण्यात आली. विद्यार्थी व शिक्षक वृंद यांच्या विकासासाठी महाविद्यालयामध्ये घेण्यात आलेल्या विविध उपक्रमाची पाहणी करून शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी या महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष 2023-24 मधील कार्यासाठी *उत्कृष्ट श्रेणी* प्रदान करण्यात आला, सातत्याने मागील तीनवर्षांपासून शास्त्री फार्मसीला उत्कृष्ट दर्जा मिळत आहे, महाविद्यालयाने मिळविलेल्या या यशा मध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उत्कृष्ठ निकाल, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोठे योगदान असल्याचे महाविद्यालयाचे अध्यक्ष व प्राचार्य डॉ. विजय शास्त्री व संस्थेचे सचिव सौ. रूपा शास्त्री यांनी सांगितले.