संत ज्ञानेश्वर विद्यालयात संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी
जळगांव दि २३- मेहरुण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात थोर समाज सुधारक संत गाडगे बाबा महाराज व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. सुरेश मामा नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली . याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष शामकांत सोनवणे यांनी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
संत गाडगेबाबांनी विवेकाच्या खराट्याने गावोगावी फिरून लोकांची मने स्वच्छ केली. साक्षरतेचा प्रचार-प्रसार केला. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात स्वच्छतेची शिकवण देऊन समाज सुधारणा करणारे ते थोर संत होते, असे प्रतिपादन मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल कोळी यांनी केले.संत गाडगेबाबा यांच्या सन्मानार्थ संत गाडगेबाबा शाळा स्वच्छता अभियानाला सुरुवात केली. या अभियाना अंतर्गत शाळा स्वच्छ ठेवणाऱ्या कामगार महिलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला भजन गायले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.