भुसावळ येथे रविवारी बामसेफचे राज्यस्तरीय अधिवेशन
बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांची उपस्थिती

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि.२३ ऑगस्ट २०२५ : (प्रतिनीधी) भुसावळ शहरात बामसेफ व राष्ट्रीय मूलनिवासी संघाच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २४ ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन कमल गणपती हॉल, शांतीनगर, येथे करण्यात आले आहे. अधिवेशनाचे उद्घाटन सकाळी १० वाजता बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे, भुसावळ येथे होणाऱ्या अधिवेशनाची जय्यत तयारी झाली असून, जिल्ह्यासह राज्यात अधिवेशनाची जनजागृती व पत्रके वाटप करून हजारो कार्यकर्त्यांना अधिवेशनास उपस्थित राहण्याचे आवाहन केले असल्याची माहिती जळगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सुमित्र अहिरे यांनी दिली.
या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम नवी दिल्ली, तर उद्घाटक म्हणून सत्यशोधक शेतकरी सभेचे महाराष्ट्र राज्य संघटक कॉ. किशोर ढमाले हे उपस्थित राहणार आहे. तसेच विशेष अतिथी म्हणून नवी दिल्ली येथील आयएमपीएचे राष्ट्रीय अध्यक्ष, मगन ससाणे, ॲड.राजेश झाल्टे , जळगाव, राष्ट्रीय उपाध्यक्ष व्ही. व्ही. जाधव, प्रभारी राष्ट्रीय समीक्षक दिपक वासनिक, भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय कार्याध्यक्ष माया जमदाडे, संदीप मानकर, बीएमपी युवा प्रकोष्ट राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अनिलकुमार माने आदींसह मान्यवर उपस्थित राहणार आहे.
या अधिवेशनात पहिल्या सत्रात ओबीसींची जातीनिहाय जनगणना घोषित करणे, बीजेपी व काँग्रेसचे विविध षडयंत्र, शेतकरी, शेतमजूर, कामगार, रेल्वे व इतर कर्मचारी वर्गाच्या मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून संविधानिक अधिकारांपासुन वंचित ठेवून सामाजिक, शारीरिक, मानसिक, आर्थिक शोषण विषयावर विचार मंथन, बहुजन समाजाला साधनविहिन करुन दीर्घ गुलाम करण्याच्या षडयंत्रावर चर्चा होणार आहे. या अधिवेशनास सर्व मुलनिवासी भारतीयांसह नागरिकांनी उपस्थित राहुन सहकार्य करावे,असे आवाहन महाराष्ट्र राज्य बामसेफ व सर्व सहयोगी संघटनांतर्फे करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेस बहुजन मुक्ती पार्टीसह विविध सहयोगी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






