जळगांव जिल्हास्पोर्ट्स

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात; पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

| लोकमाध्यम न्युज | जळगाव  (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे टि-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अनुभूती निवासी स्कूलच्या मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेचे आयोजन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांच्या मार्गदर्शनातून झाले. जिल्ह्यातून २९ संघानी सहभाग घेतला. पहिला सामना इतिहाद लेसर स्पोर्टस विरुद्ध ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब यांच्या दरम्यान झाला. अतितटीचा झालेला हा सामना ब्ल्यू डायमंड संघाने ७ धावांनी जिंकला. उद्घाटन सोहळ्यावेळी जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष युसूफ मकरा यांनी नाणेफेक केली. क्रीडांगण पूजन रवींद्र धर्माधिकारी यांनी केले. यावेळी त्यांच्यासमवेत सचिव अरविंद देशपांडे उपस्थित होते.  सूत्रसंचालन मोहम्मद फजल यांनी केले.

ब्ल्यू डायमंड संघातर्फे यश सूर्यवंशी ने ३६ चेंडूत ५४ धावा केल्यात. हितेश पाटील ३४ चेंडूत २७ धावा केल्या. गोलंदाजीमध्ये रफिक शेख ३ विकेट घेतल्यात. त्याला धरू शिसोदे याने २ विकेट घेऊन उत्तम साथ दिली. इतिहाद लेसर स्पोर्टस चे फलंदाज सादिक देशमुख याने ३१ चेंडूत ३१ धावा, रईस शेख १४ चेंडू १९ धावा केल्यात. तर गोलंदाजीत प्रेम दिवेदी याने ४ विकेट घेत समोरच्या संघाचे कंबरडे मोडले. त्याला शशिकांत वर्मा, मनीष चौबे यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद करुन साथ दिली.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button