जळगांव जिल्हावैद्यकिय

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार; खान्देशात पहिल्यांदाच प्रयोग

| लोकमाध्यम न्युज | जळगाव (प्रतिनिधी) दि. २२ – येथील अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटल अँड अँडव्हान्स्ड स्ट्रोक सेंटरमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक ‘सिल्क व्हिस्टा फ्लो डायव्हर्टर’ या तंत्रज्ञानाचा वापर करून मेंदूतील ‘अँन्युरिझम’ या अत्यंत गंभीर आजारावर यशस्वी उपचार करण्यात आले. प्रसिद्ध इंटरव्हेंशनल न्यूरोलॉजिस्ट डॉ. निलेश किनगे व त्यांच्या टीमने खानदेशात पहिल्यांदाच या तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णाला नवजीवन दिले आहे.

रुग्णाला तीव्र डोकेदुखी आणि चक्कर येण्याचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे ‘एमआरआय’ आणि ‘डीएसए’ तपासणीदरम्यान रुग्णाच्या मेंदूतील मुख्य रक्तवाहिनीला मोठा फुगा (अँन्युरिझम) झाल्याचे निष्पन्न झाले. हा फुगा फुटल्यास मेंदूत तीव्र रक्तस्राव होऊन अर्धांगवायू किंवा जीवितास धोका निर्माण झाला असता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉ. निलेश किनगे यांनी कोणतेही ओपन ब्रेन सर्जरी न करता केवळ मांडीच्या धमनी द्वारे मेंदूत पोचून ‘सिल्क व्हिस्टा फ्लो डायव्हर्टर स्टॅट बसवून’ यशस्वीरीत्या आधुनिक न्यूरो इंटरनॅशनल शस्त्रक्रिया केली. अत्याधुनिक स्टेंटमुळे रक्ताचा प्रवाह फुग्यामध्ये न जाता थेट मुख्य रक्तवाहिनीतून सुरू झाला, ज्यामुळे अँन्युरिझमचा फुटून रक्तस्राव होण्याचा धोका पूर्णपणे टळला या उपचारानंतर रुग्ण पूर्णपणे सुखरूप असून आज डिस्चार्ज देण्यात आला. या या पूर्ण प्रोसिजरमध्ये डॉक्टर विनोद किंनगे भूलतज्ञ यांचे अमूल्य सहकार्य लाभले. खान्देशातच अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय दर्जाची न्यूरो-इंटरव्हेंशनल सुविधा उपलब्ध झाल्याने रुग्णांना आता मुंबई, पुणे किंवा नागपूरसारख्या दूरच्या शहरांत जाण्याची गरज नाही, असे मत डॉ. निलेश किनगे यांनी व्यक्त केले. रुग्णाच्या नातेवाइकांनी डॉ. किनगे व अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलच्या वैद्यकीय टीमचे मनःपूर्वक आभार मानले.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button