जळगाव दि.६ जुन २०२४ : शहरातील मनप्पुरम फायनान्स लिमीटेड या संस्थेत बनावट सोने देऊन पैसे उकळणाऱ्या चौघांना जळगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे.
जळगाव आणि आग्रा येथील संशयीत पोलिसांच्या ताब्यात असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अटक केलेली गँग असे गुन्हे करण्यात तरबेज असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
जळगावातील मनप्पुरम फायनान्स लिमीटेड या खाजगी संस्थेत हर्षल रविंद्र पेटकर, वय २३ वर्षे हे व्यवस्थापक आहेत. जळगावातील नवीपेठ परिसरात ते राहतात. मनप्पुरम फायनान्स लिमीटेड संस्थेचे नवीपेठ परिसरातील कुकरेजा कॉम्प्लेक्समध्ये कार्यालय आहे. सोने तारण ठेवून कर्ज देण्याचे काम याठिकाणी होत असते.
मनप्पुरम फायनान्स लिमीटेड संस्थेत दि.१ जून रोजी बँकेत सायंकाळी ४.३५ च्या सुमारास आलेले जोराराम रानुराम बिस्नोई, वय ५० वर्ष, खेतेंद्र ओमप्रकाश शर्मा, वय ३१ वर्षे यांनी बनावट, खोटे सोन्याचा मुलामा चढवलेले दागिने खरे आहेत म्हणुन गहाण ठेवुन त्याबदल्यात कर्ज रुपी २ लाख ६६ हजार रुपये स्वतःच्या फायद्याकरीता लबाडीने मिळविले होते. दि.५ जून रोजी तशाच प्रकारचे दागिने घेऊन दोन इसम आल्याने ते पाहून व्यवस्थापक चक्रावले. तपासणी केली असता ते सोने बनावट असल्याचे त्यांचा लक्षात आले, त्यामुळे त्यांनी अगोदर सोने ठेवलेल्या दोघांना ज्यादा ४० हजार देण्याचे आमीष देत बोलावून घेतले.
पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात
बुधवारी दुपारी ११ वाजेच्या सुमारास जोराराम रानुराम बिस्नोई, वय ५० वर्ष, खेतेंद्र ओमप्रकाश शर्मा, वय ३१ वर्षे हे वाढीव रक्कम घेण्यासाठी आले होते. बँकेचे सहकारी आणि व्यवस्थापक यांनी दोघांना कार्यालयात थांबवले आणि शहर पोलिसांना बोलावले. शहर पोलिसांनी धाव घेत दोघांना ताब्यात घेतले. अधिक चौकशी करता एका लॉजमध्ये थांबलेले सतिषचंद शोवरन सिंग, वय ३२ वर्ष, व्यवसाय इस्टेट, आग्रा, उत्तरप्रदेश आणि संतोष मुन्नालाल कुशवाह वय ३५ वर्ष, व्यवसाय रिक्षा चालक, आग्रा, उत्तरप्रदेश यांना ताब्यात घेतले.
शहर पोलिसात गुन्हा दाखल
बँकेचे व्यवस्थापक हर्षल रविंद्र पेटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगांव शहर पो.स्टे.ला CCTNS गु.र.नं. 271/2024, भा.द.वी कलम 420, 34 प्रमाणे आरोपी जोराराम रानुराम बिस्नोई, वय ५० वर्ष, व्यवसाय गॅस डिलीवरी बाँय, पत्ता अकबर अली महेमुद अली, नशिराबाद बस स्टॅन्ड जवळ, ता जि. जळगांव आणि मंगळ मदिर, रामेश्वर कॉलनी, मेहरुण, जळगांव, मुळ गाव दोडासर ता.जि.फलौदी, राजस्थान, खेतेंद्र ओमप्रकाश शर्मा, वय ३१ वर्षे, व्यवसाय सोन्याचा कारागीर, पत्ता-बालाजीपेठ, बालाजी मंदिरासमोर, शनिपेठ, जळगाव, मुळ रा. घर नं.११ सी/१२४, नरायच सब्जीमडी, रामबाग, आग्रा, उत्तर प्रदेश, सतिषचंद शोवरन सिंग, वय ३२ वर्ष, व्यवसाय इस्टेट, आग्रा, उत्तरप्रदेश, फायनान्स, पत्ता घर नं.२९, कंवरनगर, मारोती, संतोष मुन्नालाल कुशवाह वय ३५ वर्ष, व्यवसाय रिक्षा चालक पत्ता घर नं. 46/1019, गल्ली नं.१७, किशोरपुरा, बोथला रोड, आग्रा, उत्तरप्रदेश यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार रविद्र सोनार करीत आहे.