जळगावमहाराष्ट्रसांस्कृतिक

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता

| लोकमाध्यम न्युज | जळगाव : (प्रतिनिधी) – भारतीय संगीताच्या आकाशातील अजरामर स्वरकन्या आशा भोसले यांच्या निधनाची बातमी मनाला चटका लावून गेली. त्यांच्या सुरांनी अनेक पिढ्यांचे आयुष्य समृद्ध केले, तर त्यांच्या गाण्यांमध्ये निसर्गाची कोमलता, मातीचा सुगंध आणि जीवनातील ओलावा कायम जाणवत राहिला. कविवर्य ना. धों. महानोर यांच्या काव्यातील मातीशी असलेली नाळ जशी जिवंत आहे, तशीच ती आशाताईंच्या स्वरांतूनही अनुभवायला मिळाली. त्यांच्या काही गाण्यांतून शेती, निसर्ग आणि मातीतल्या भावविश्वाचा सुगंध दरवळत राहिला, जणू काळजाशी जपलेली आपल्या भूमीची ओळखच. श्रद्धेय भवरलाल जैन यांच्या कार्यातून जसे जल, जमीन आणि शेतकऱ्यांशी नाते जपले गेले, तसेच आशाताईंच्या सुरांतूनही जीवनाशी असलेले नाते अधिक दृढ झाले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पहिल्या पदवी प्रदान सोहळा दि. ७ सप्टेंबर १९९३ ला झाला होता. त्यावेळी आशाताई भोसले व ज्येष्ठ साहित्यीक भालचंद्र नेमाडेदादा यांना डिलीट पदवी प्रदान करण्यात आले होते. त्यावेळी जैन हिल्स येथे त्यांच्या भेटीचा तो प्रसंग आजही मनात ताजा आहे, साधेपणाने, प्रेमाने आणि आत्मीयतेने झालेला संवाद आजही स्मरणात कोरलेला आहे. त्यांच्या सुरांनी निसर्गाला आवाज दिला, मातीला अर्थ दिला आणि मनाला शांती दिली. अशी स्वरसम्राज्ञी आता आपल्यात नसली तरी त्यांचे गीतरूपी अस्तित्व सदैव जिवंत राहील.

अशोक भवरलाल जैन,अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.

 – स्वरसम्राज्ञी आशाताई भोसले यांच्यासमवेत श्रद्धेय भवरलालजी जैन, कविवर्य ना. धों. महानोर व मान्यवर (संग्रहित छायाचित्र दि. 07/09/1993)

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button