लोकमाध्यम न्युज | जळगांव दि. ४ ऑगस्ट २०२४ |
माध्यमिक विद्यालय वावडदा ता. जि. जळगाव या शाळेत वृक्षारोपण संवर्धन कार्यक्रम उत्साहात गांधी रिसर्च फौंडेशन व माध्यमिक विद्यालय वावडदा याच्या संयुक्त विद्यमानाने ने हाती घेतला आहे. वन महोत्सव कार्यक्रम अंतर्गत व एक पेड मां के नाम या धोरणानुसार शाळेच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या शाळेच्या परिसरात करंज,आवळा,आंबा, गुलमोहर, सीताफळ, पिंपळ,निबं, साग, सेतू, जास्वंद, चिंच या ११ प्रकारची ५० झाडें मान्यवराच्या हस्ते लागवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमाप्रसंगी सेवानिवृत्त वन अधिकारी तथा सल्लागार वन,वन्यजीव व पर्यावरण विभाग जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेडचे राजेंद्र राणे, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक एन. आर. दाणे, शिक्षक ऐ. डी. पाकले, एम.डी.अहिरे, एम.आर. चौधरी,एस.बी. पाटील, ऐ. एम पाटील, कुंदन पाटील व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
प्रत्येक विद्यार्थ्याने एक मुलं एक झाड ही संकल्पना विध्यार्थ्यांनी राबविली पाहिजे. तसेच प्रत्येक विध्यार्थ्यांने आपल्या घराजवळ एक झाड लावून त्या झाडाचे जतन करावे असे आवाहन विध्यार्थ्यांना करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गांधी रिसर्च फौंडेशनचे क्षेत्रीय अधिकारी विक्रम अस्वार व रामदेववाडी गावातील सामाजिक कार्यकर्ते जीवन राठोड यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.