लोकमाध्यम न्युज | जळगांव दि. ८ ऑगस्ट २०२४ |
उत्तर महाराष्ट्रातील वंजारी समाजाचा जिव्हाळ्याचा आणि त्रासदायक विषय मार्गी लागला आहे.वंजारी समाजातील काही समाजबांधवांच्या कागदोपत्री हिंदु-वंजारी ऐवजी हिंदु-लाड वंजारी असे लिहील्यामुळे जात प्रमाणपत्र व जातपडताळणी साठी गेली कित्येक वर्ष संबंधित समाज बांधव संघर्ष करित होते.
आजोबा-पंजोबाच्या नोंदी लाड वंजारी पण पूढील पिढिने वंजारी असे लिहले गेल्यामुळे प्रशासकिय स्तरावर खुप त्रास सहन केला गेला आहे.
.प्रशांत नाईक व त्यांच्या सहकारी यांनी यासाठी खुप मेहनत घेतली आहे.यासाठी स्व. लोकनेते गोपीनाथजी मुंडे आमदार पंकजा मुंडे नामदार धनंजय मुंडे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस ,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सर्व कॅबिनेट मंत्र्यांचे यासाठी सहकार्य लाभले व जळगाव येथील समाजसेवक राजेंद्र साबळे असतील किंवा धुळे येथील राजेंद्र डोमाळे नंदुरबार येथील समाज बांधवांनी वेळोवेळी एकत्रित येऊन 2005 पासून पाठपुरावा सुरू ठेवला होता. जळगाव जिल्ह्यातील वंजारी युवा संघटना संपूर्ण टीमने वेळोवेळी निवेदन देऊन पाठपुरावा सुरू ठेवला होता. सदरच्या पाठपुराव्याला आज खऱ्या अर्थाने यश मिळालेले आहे. संपूर्ण उत्तर महाराष्ट्र मध्ये आनंदाचे वातावरण आहे.तसेच विधान परिषदेत गेल्या दोन ते तीन वर्षापासून सतत पाठपुरावा सुरू ठेवल्या मुळे खास करून .किशोर जी दराडे व समितीचे सदस्य खराडे साहेब यांचे समाज मनस्वी आभारी राहील अशा भावना प्रशांत नाईक यांनी व्यक्त केल्या..