जळगावमहाराष्ट्र
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन जळगाव जिल्हा दौऱ्यावर ; मान्यवरांना भेटणार
लोकमाध्यम न्युज | जळगाव ७ सप्टेंबर २०२४ |
महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचा 9 व 10 सप्टेंबर असा जळगाव जिल्ह्याचा संभाव्य दौरा असणार असून या दौऱ्यात ते विविध क्षेत्रातील मान्यवरांना भेटणार आहेत.
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या नियुक्तीनंतर दोन दिवसाच्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून ते या दौऱ्यात ते जिल्ह्यातील शिक्षण, सामाजिक, राजकीय, उद्योग अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना भेटणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.