आमदार राजुमामांचा मॉर्निंग वॉक प्रचार : नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद
लोकमाध्यम न्युज | जळगांव ४ नोव्हेंबर २०२४ |
शहरातील विविध उद्यानामध्ये पहाटे आ.राजुमामा भोळे यांनी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला विजयी करण्यासाठी आवाहन केले. नागरिकांनी प्रतिसाद देऊन सकारात्मकता दर्शवली.
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून आ. राजु मामा भोळे हे सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. शनिवारी पहाटे शहरातील प्रसिद्ध भाऊंचे उद्यान, बहिणाबाई उद्यान आणि सागर पार्क मैदानावर परिसरातील आलेल्या नागरिकांशी राजु मामा भोळे यांनी भेट घेऊन संवाद साधला. यावेळी नागरिकांनी शहरातील विविध प्रश्नांविषयीच्या आ. राजु मामा भोळे यांच्याशी चर्चा केली.
जळगाव शहरातील विविध विकास कामांबाबत नागरिकांनी आ.राजु मामा भोळे यांच्याजवळ समाधान व्यक्त केले. तसेच मतदार संघातील यंदाही उर्वरित प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आ. राजु मामा भोळे यांच्या पाठीशी कायम राहू अशी ग्वाही नागरिकांनी याप्रसंगी दिली. गेल्या पंचवार्षिक काळात शासनाच्या विविध योजनांमुळे नागरिकांना दिलासा मिळाला, अशी माहिती यावेळी नागरिकांनी दिली.