स्वर सम्राट, लोकप्रिय गझल गायक पंकज उधास यांचे निधन
मुंबई दि.२६ फेब्रुवारी २०२४ : प्रसिध्द लोकप्रिय गझल गायक स्वर सम्राट पंकज उधास यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी आज २६ रोजी दुःखद निधन झाले. ते अनेक दिवसांपासून आजारी होते.
बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक पंकज उधास यांचे निधन झाले. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुलगी नायब उधास यांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली. प्रदीर्घ आजाराने २६ फेब्रुवारी रोजी त्यांचे निधन झाल्याचे सांगितले. .’ना कजरे की धार’, ‘चिठ्ठी आयी है…’ चांदी जैसा रंग है तेरा’ अशा अनेक गाण्यांना आवाज देणारे गायक आणि पद्मश्री पुरस्कार विजेते पंकज उधास यांचे निधन झाले आहे. मुलगी नायब उधास यांनी लिहिले की, ‘जड अंत:करणाने मी तुम्हा सर्वांना ही दुःखद शोक व्यक्त करते की पद्मश्री पंकज उधास राहिले नाहीत. २६ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते बरेच दिवस आजारी होते. पंकज उधास यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला
प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पंकज उधास यांच्या पी.ए.ने सांगितले की, 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता गायकाचा मृत्यू झाला. त्यांना मुंबईतील बीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून ठीक नव्हती. पंकज उधास 1980 साली ‘आहट’ या गझल अल्बमने प्रसिद्धी झोतात आले. हिंदी चित्रपट आणि भारतीय पॉप संगीतातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी ते ओळखले जातात. 2006 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.