श्री संत जगनाडे महाराज बहुद्देशीय संस्थेतर्फे आज राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन
लोकमाध्यम न्युज | जळगांव २९ डिसेंबर २०२४ |
जळगाव येथील शारदा एज्युकेशन फाउंडेशन व श्री संत जगनाडे महाराज बहुद्देशीय संस्थेतर्फे राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय मेळावा रविवार दि. २९ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यामध्ये हजारोंच्या संख्येने समाजबांधव उपस्थित राहणार आहेत.
दरवर्षीप्रमाणे शारदा एज्युकेशनल फाउंडेशन आयोजित श्री संत जगनाडे महाराज महाराज बहुद्देशीय संस्थेतर्फे राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय मेळावा यंदाही मोठ्या उत्साहात घेण्यात येत आहे. हा मेळावा रविवार दि.२९ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता दादासो शांताराम नारायण चौधरी नगर, खान्देश सेंट्रल मॉल परिसर, जळगाव या ठिकाणी होत आहे. विवाहेच्छुक तरुणांनी, समाजबांधवांनी नोंदणीसाठी चांगला प्रतिसाद दिला आहे.
तेली समाजाची वधू-वर परिचय पुस्तिका हि पूर्ण राज्यात व देशातील काही भागात देखील वितरित होत असते. या सूचीचे काम पूर्ण झाले आहे. मेळाव्याला गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून विवाहेच्छुक वधू-वरांनी मेळाव्यात उपस्थिती द्यावी असे आवाहन अध्यक्ष प्रशांत सुरळकर, उपाध्यक्ष बबन चौधरी, विशाल पाटील, सचिव रामचंद्र चौधरी यांनी केले आहे.