मुस्लिम बांधवां तर्फे आदित्य ठाकरे यांचे जल्लोषात स्वागत
जळगांव दि १६ : शिवसेना (उबाठा) नेते, युवा सेना प्रमुख तथा माजी मंत्री आदित्य उद्धव ठाकरे यांचे जनसंवाद यात्रेनिमित्त जळगाव जिल्ह्यात आगमन झाल्यावर जळगाव शहरातील भिलपुरा येथे शहरातील मुस्लिम बांधवांतर्फे जोरदार जंगी स्वागत करण्यात आले.
आदित्य ठाकरे यांचे आगमन होताच जोरदार पुष्पवृष्टी करण्यात आली, ढोल ताशांच्या गजरात, फटाके फोडून तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी ठाकरे यांनी मी व माझा पक्ष सदैव अल्पसंख्यांक समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहुन समाजाचे प्रश्न सोडविण्याची ग्वाही दिली.
याप्रसंगी मुस्लिम समाजाचे सै. अयाज अली नियाज अली, हाजी सिराजुद्दीन, हाजी शकूर बादशाह, हाजी शेख मोहम्मद, शेख सलीम उद्दीन, शफी ठेकेदार, इलियास नुरी, खालीद खान, जावेद अहमद, अरशद अजगर, अफरोज खान, वसीम कुरेशी, जावेद बागवान, शेख जलालुद्दीन, शेख मेहबूब, रहीम कुरेशी,झीशान हुसेन, रहेमान कुरैशी,अकबर इब्राहिम, इरफान जाफर, नूर मोहम्मद, अब्दुल वहाब यांसह असंख्य नागरिक उपस्थित होते.