
| लोकमाध्यम News | जळगाव : दीपावलीच्या मंगल पर्वाचे औचित्य साधून महापौर दीपमाला काळे यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही वार्ड क्रमांक ७ मधील सफाई कर्मचाऱ्यांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. शहराची स्वच्छता आणि आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.
सफाई कर्मचारी हे शहराच्या स्वच्छतेचे खरे दूत आहेत. सण-उत्सवाच्या काळातही स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता ते शहराच्या स्वच्छतेसाठी तत्पर असतात. त्यांच्या या योगदानाचा सन्मान म्हणून दरवर्षी हा उपक्रम घेतला जातो.भेटवस्तू मिळताच कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
या कार्यक्रमास माजी नगरसेवक मनोज काळे, स्वच्छता निरीक्षक सुरज तांबोळी यांच्यासह इतर मान्यवर, नागरिक आणि पालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






