लोकमाध्यम न्युज | जळगांव १८ नोव्हेंबर २०२४ |
जळगांव – राष्ट्रसंत युग दिवाकर परमपूज्य नम्रमुनिजी मा. सा.(जैन मुनि) साहेब संचलित लूक अँड लर्न जळगाव तर्फे अनुभूती स्कूल येथे ज्ञान पंचमी अध्यात्मरित्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या दिवशी लूक अँड लर्न च्या सर्व विद्यार्थ्यांनी ज्ञानयंत्राचे पूजन केले. ज्ञानवृद्धीसाठी आणि शालेय जीवनात यशप्राप्तीसाठी काय प्रयत्न करावे यावर छोटीशी नाटिका प्रस्तुत करण्यात आली.
एक छोट्या विद्यार्थिनीने सरस्वती देवी माते चे वेशभुषा केली होती. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी विद्येच्या देवतेस अभिवादन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सगळ्या लुक अँड लर्न दीदींनी परिश्रम घेतले. अनुभूती स्कूल येथे दर रविवारी सकाळी साडेनऊ ते साडेअकरा या वेळेत सर्व जैन विद्यार्थी येथे धार्मिक आणि अध्यात्मिक पाठ शिकतात. प्रत्येक गोष्ट सायन्सचे प्रात्यक्षिक करून शिकविले जाते. विविध ऍक्टिव्हिटीज आणि गेम द्वारा मुले नाविन्यपूर्ण जेनिजम शिकतात आणि आचरणात आणतात दिनांक 10 नोव्हेंबर पासून नवीन सञ चालू झाले आहे. आपल्या मुलांना ज्ञानरंजन करावे याकरिता सदर उपक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन लूक अँड लर्न टीमने केले आहे.