लोकमाध्यम न्युज | जळगांव २२ नोव्हेंबर २०२४ |
जळगाव पीपल्स बँक रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्ट द्वारे सामाजिक,शैक्षणिक,वैद्यकीय क्षेत्रात विविध सामाजिक उपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. समाजातील सर्व थरातील रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सेवा माफक दारात उपलब्ध व्हावे या उद्येशाने तसेच संकल्प स्वास्थ सुरक्षेचा हे ब्रिद वाक्य घेवुन संस्थेने राजेश्री श्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल सुरु करण्यात आले. हॉस्पिटलमध्ये गोरगरीब सर्व सामान्य रुग्णांना माफक दारात विविध आरोग्य विषयक सेवा देण्यात येत असतांना हॉस्पिटल मध्ये कॅन्सर चे रुग्णांसाठी कॅन्सर विभाग सुरु करण्यात आला. यात प्रामुख्याने मुखकर्करोग (कॅन्सर) चे अवघड अश्या खर्चिक असणाऱ्या अश्या शस्त्रक्रिया हॉस्पिटल मध्ये तज्ञ डॉक्टरांचे मार्फत योजने अंतर्गत मोफत करण्यात येत आहे. नुकतेच हॉस्पिटल मध्ये कर्करोग विभागात जीभेच्या कर्करोगाची अतिशय अवघड शस्रक्रिया मुखरोग तज्ञ डॉ. प्रशांत चोपडा व भूलतज्ञ डॉक्टरांच्या टीम ने यशस्वी पणे केली.
सदर शस्रक्रियेसाठी बाहेर अतिशय खर्चिक असून सर्वसामान्यांना न परवडणारी आहे. अशी जिभेचे कर्करोगाची शस्रक्रिया खुप अवघड होती यामध्ये रुग्णाला तोंड उघडण्यासाठी जागा खुप कमी असल्याने त्यास अत्याधुनिक मशिनरी व दुर्बिणीद्वारे भूल देण्यात आली. सदर रुग्णाच्या जिभेवर शस्रक्रिया करून कर्कजंतु (कॅन्सर) पसरू नये म्हणुन *गळ्याच्या दोन्ही बाजु स्वच्छ* करून जिभेचा नवीन भाग तयार करण्यात आला. अत्याआधुनिक तंत्रज्ञान व डॉक्टर व सर्व टीम चे अथक परिश्रमांनी शस्रक्रिया यशस्वी करण्यात आली व रुग्णाला नवीन जीवनदान मिळाले.
सदर शस्त्रक्रिया हॉस्पिटल मधे महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत करण्यात आली.
सदर शस्त्रक्रिया यशस्वी करणेसाठी मुखरोग तज्ञ डॉ. प्रशांत चोपडा व भूलतज्ञ डॉ अमित हिवरकर व हॉस्पिटल मधील नर्सिंग कर्मचारी टीमचे तसेच डॉ.अर्जुन साठे तसेच आदी तज्ञ डॉक्टरांचे सहकार्य लाभले.
याचमुळे शाहु महाराज हॉस्पिटल असंख्य गोरगरीब व सर्वसामाण्यासाठी मोठा आधार स्तंभ असल्याचे सिद्ध होते, याची पावती म्हणजे येथुन लाभार्थी होणाऱ्या रुग्णांच्या चेहऱ्यावरील समाधान होय.
तरी सर्व योजनांचा व हॉस्पिटलमधील आरोग्य सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे चेअरमन श्री. प्रकाश चौबे व हॉस्पिटलचे व्यवस्थापक श्री.संतोष नवगाळे यांनी केले आहे.