भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या इच्छापूर्ती गणेशाचे हजारो भाविकांनी घेतले दर्शन
१८ फेब्रुवारी रोजी २५ हजार भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन
जळगांव : गणेश जयंती निमित्त येथील विसनजी नगरातील भक्तांच्या मनोकामना पुर्ण करणाऱ्या श्री इच्छापूर्ती गणेश मंदिरात बुधवारी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. गणेश जयंती निमित्त मंदिरातील दोन्ही फोटो मूर्ती विविध प्रकारच्या फुलांनी सजवण्यात आल्या होत्या आहे. सकाळी मंत्रोच्चारात विधिवत पूज न करतांना दुग्धाभिषेक , व आरती तसेच दुपारी ११ ब्राह्मणांच्या उपस्थित श्रीगणेश सहस्रावर्तन कार्यक्रम संपन्न झाला. संध्याकाळी ७ वाजता मंदिराचे मुख्य विश्वस्त शाम कोगटा व रोहित कोगटा यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. याप्रसंगी भाविकांना चुरम्याचा लाडू, व सुकामेवा प्रसादाचे वाटप करण्यात आले .गणेश जयंती निमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
पुजारी सुनील बारपांडे,रवींद्र नांदे प्रमोद जोशी भूषण पाठक यांनी परिश्रम घेतले. रविवार दिनांक १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ ते ४ या वेळेत २५ हजार भाविकांसाठी महाप्रसाद वाटप केला जाणार आहे.